भजनी मालिका
← भजनांकडे परत

कानडीनें केला मर्‍हाटा भ्रतार । एकाचें उत्तर एका न ये

kanadinen kela mar‍hata bhratar | ekachen uttar eka na ye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कानडीनें केला मर्‍हाटा भ्रतार । एकाचें उत्तर एका न ये ॥१॥ तैसें मज नको करूं कमळापति । देई या संगति सज्जनांची ॥ध्रु.॥ तिनें पाचारिलें इल बा म्हणोन । येरु पळे आण झाली आतां ॥२॥ तुका म्हणे येर येरा जें विच्छिन्न । तेथें वाढे सीण सुखा पोटीं ॥३॥