भजनी मालिका
← भजनांकडे परत

कवणावरी आतां देऊं हें दूषण । माझें मज भूषण गोड लागे

kavanavari atan deun hen dushan | majhen maj bhushan god lage

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
कवणावरी आतां देऊं हें दूषण । माझें मज भूषण गोड लागे ॥१॥ गुंतलासे मीन विषयाचें गळीं । तैसा तळमळी जीव माझा ॥२॥ गुंतला हरिण जळाचिया आशा । तो गळां पडे फांसा काळपाश ॥३॥ वारितां वारेना सारितां सारेना । कितीसा उगाणा करूं आतां ॥४॥ चोखा म्हणे ऐसा पडलों प्रवाहीं । बुडतसों डोहीं भवाचिया ॥५॥