भजनी मालिका
← भजनांकडे परत

कंस धाडी अघासुर । मारी नंदाचा कुमर

kans dhadi aghasur | mari nandacha kumar

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कंस धाडी अघासुर । मारी नंदाचा कुमर ॥१॥ एक ओंठ घाली खालीं । दुजा मेघाच्या मंडळीं ॥२॥ गाई गोपाळ उदरीं । देवा कळलें अंतरीं ॥३॥ आंत प्रवेशला कृष्ण । रूप धरीत वामन ॥४॥ क्षणार्धेंची मारी । भक्तजनाचा कैवारी ॥५॥ भेणें गोपाळ पडिले । कृपा दृष्टि अवलेकिले ॥६॥ तेज अद्‍ भुत निघालें । कृष्णमुखीं प्रेवशलें ॥७॥ भक्तासी रक्षीत । नामा ह्मणे कृष्णनाथ ॥८॥