भजनी मालिका
← भजनांकडे परत

कवणांशीं भांडों कोण माझें साहे । कोण मज आहे तुजविण

kavananshin bhandon kon majhen sahe | kon maj ahe tujavin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कवणांशीं भांडों कोण माझें साहे । कोण मज आहे तुजविण ॥१॥ धरिलें उदास दुरदुरांतरें । सांडी एकसरें केली माझी ॥ध्रु.॥ आइकोन माझे नाइकसी बोल । देखोनियां खोळ बुंथी घेसी ॥२॥ तुका म्हणे एके गांवींची वसती । म्हणऊनि खंती वाटे देवा ॥३॥