भजनी मालिका
← भजनांकडे परत

करीना साधन जिवासी बंधन । कोणे काळीं मन नोहे शुद्ध

karina sadhan jivasi bandhan | kone kalin man nohe shuddha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
करीना साधन जिवासी बंधन । कोणे काळीं मन नोहे शुद्ध ॥१॥ करूं जातां तप अभिमानरूप । त्रिविधादि ताप कैसा निवे ॥२॥ नित्यानित्य करी विवेक आपण । तेणें अभि-मान वाढतसे ॥३॥ नामा ह्मणे जन्म विसरोनियां गेलों । मरोनि राहिलों देहातीत ॥४॥