भजनी मालिका
← भजनांकडे परत

करिती दुःख न धरा चित्ती । सुख मानी

kariti duhkh na dhara chitti | sukh mani

रचनाकार: संत बोधले · अभंग
करिती दुःख न धरा चित्ती । सुख मानी ॥१॥ आपलाली कर्मे आपण भोगिती । केल्यावीण देती झाडा जणी ॥ २ ॥ तेथे आनंदाचे । प्रगट विकार केवि उठे हृदयी प्रगट रामरुप ॥ ३॥ येथे माझा स्वामी कृपाळू पाही । पाप दृष्टी काही न राहे तेथे ॥४॥ जळी बुडलीया तृण आज्ञा केली लागे जाण । रामी रतलिया मन पाप केवी राहे ॥५॥ बोधला म्हणे मन रामी विनटले । दहन झाले संसाराचे ॥६॥