भजनी मालिका
← भजनांकडे परत

करीं घेऊनि ब्रह्मविणा । नारद वोळगे नारायणा

karin gheuni brahmavina | narad volage narayana

रचनाकार: संत नामदेव · अभंग
करीं घेऊनि ब्रह्मविणा । नारद वोळगे नारायणा ॥१॥ हेंचि हेंचि तत्त्वसार । नाम म्हणे निरंतर ॥२॥ आपण शिव आणि शक्ति । रामनाम ते जपती ॥३॥ गात नाचत प्रल्हाद वीर । खांबी केलासे अवतार ॥४॥ कुंटिणी पक्षिया म्हणे रामा । तिसी नेलें निजधामा ॥५॥ अहल्येसी लागतां चरण । तिसीं आलें मनुष्यपण ॥६॥ अजामेळ पातकी अपार । नामें पावला पैलपार ॥७॥ गजेंद्रें केलेम स्मरण । त्याचें तोडिले बंधन ॥८॥ द्रौपदी स्मरे ह्रषिकेसी । वस्त्रें पुरविलीं तियेसी ॥९॥ परीक्षितासी घडलें स्मरण । त्यासी जाले सुलभ चरण ॥१०॥ नामा म्हणे निरंतरु । गगनीं अढळ केला धुरु ॥११॥