भजनी मालिका
← भजनांकडे परत

करिसी तें देवा करीं माझें सुखें । परी मी त्यासी मुखें न म्हणें संत

karisi ten deva karin majhen sukhen | pari mi tyasi mukhen na mhanen sant

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करिसी तें देवा करीं माझें सुखें । परी मी त्यासी मुखें न म्हणें संत ॥१॥ जया राज्य द्रव्य करणें उपार्जना । वश दंभमाना इच्छे जाले ॥ध्रु.॥ जगदेव परी निवडीन निराळे । ज्ञानाचे आंधळे भारवाही ॥२॥ तुका म्हणे भय न धरीं मानसीं । ऐसियाचे विशीं करितां दंड ॥३॥