भजनी मालिका

भजने

ऐसी हे गर्जवूं वैखरी । केशव मुकुंद मुरारी । राम कृष्ण नामें बरीं । हरी हरी दोष सकळ ॥१॥ जनार्दना जगजीवना। विराटस्वरूपा वामना । महदादि मधुसूदना । भवबंधना तोडितिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐसींचि देखिलीं उंदडें । जळो त्यांची काळीं तोंडें ॥१॥ मुखें सांगती परमार्थ । स्वार्थ अंतरी अनर्थ ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसें असतां तो सरूम आला काळ । प्रारब्धाचें बळ कैसें पाहा ॥१॥ हिंडता हिंडता फार कष्टि झाला । दृष्टिस तयाला न पडे कांहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसें एकोनियां यशोदा । म्हणे तरी मी न सोडी तूंते कदा । अंतरलें काम माझा धंदा । राहें गोविंदा ऐसाचि ॥१॥ बोलोनियां तें ऐसें गेली । आपुल्या कामा वरीपडि झाली । पुढें कृष्णे युक्ति केली । अति विचित्र ते ऐका ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसें ऐकोनियां उत्तर । देव म्हणे उदर धीर तुम्ही ॥१॥ तुमच्याचि काजा रुपासि येणें । मजलागीं धरणें अवतार ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसें ऐकोनियां प्रेमा आला पोटीं । म्हणे बोलावी ते गोष्टी अनुभवाची ॥१॥ येर ते कर्मधर्म सर्वही पाल्हाळ । श्रमुचि केवळ जाणिवेचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसें ऐकोनियां राजाई ते आली । रोषें येऊनि बोली बोलातसे ॥१॥ देवानें हें दिलें तुम्ही कां पाठवा । काशाचा गणोबा बोलतसा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसें ऐकोनी नामा विचारी मानसीं । काय द्यावेम यासी प्रतिवचन ॥१॥ विठोबाचे पाय आठविले मनीं । बोले अमृतवचनीं तयाप्रति ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसे ऐसियानें भेटती ते साधु । ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू । जे कां सिच्चदानंदीं नित्यानंदु । जे कां मोक्षसिद्धी तीर्थ वंदूं रे ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐसें कलियुगाच्या मुळें । झालें धर्माचें वाटोळें ॥१॥ सांडुनियां रामराम । ब्राम्हण म्हणती दोमदोम ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐसें कां जालें तें मज ही न कळे । कीर्तनाचे रळेपळे जगीं ॥१॥ कैसें तुम्हां देवा वाटतसे बरें । संतांचीं उत्तरें लाजविलीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐसें कांहीं एक अपूर्व देखिलें । ह्रदयीं कोंदाटलें मूर्तिरूप ॥१॥ परी तें कांहीं तैसें न राहे निश्चळ । चित्त तें चंचळ मावारलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसे कांही दिन लोटलेसे जाण । परिसा कारण देवाचें तें ॥१॥ नाम्यासी चौघे पुत्र पैं जाहले । नाम तें ठेविलें विठ्ठलरायें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ