भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें कां जालें तें मज ही न कळे । कीर्तनाचे रळेपळे जगीं

aisen kan jalen ten maj hi na kale | kirtanache ralepale jagin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसें कां जालें तें मज ही न कळे । कीर्तनाचे रळेपळे जगीं ॥१॥ कैसें तुम्हां देवा वाटतसे बरें । संतांचीं उत्तरें लाजविलीं ॥ध्रु.॥ भाविकां कंटक करिताती पीडा । हा तंव रोकडा अनुभव ॥२॥ तुका म्हणे नाम निर्वाणीचा बाण । याचा अभिमान नाहीं तुम्हां ॥३॥