भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसे कांही दिन लोटलेसे जाण । परिसा कारण देवाचें तें

aise kanhi din lotalese jan | parisa karan devachen ten

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐसे कांही दिन लोटलेसे जाण । परिसा कारण देवाचें तें ॥१॥ नाम्यासी चौघे पुत्र पैं जाहले । नाम तें ठेविलें विठ्ठलरायें ॥२॥ एका जनार्दनीं भक्ताचा सोहळा । दावितसे डोळां उघड ऐका ॥३॥