भजनी मालिका

भजने

ऐसी कीर्तनाची आवडी । प्रायश्चित्तें जाली देशधडी ॥१॥ होती तीर्थें तीं बापुडीं । मळ रोकडी टाकिती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐसी चिंताक्रांत मनीं दुःख धरिलें । म्हणे कां बापें दिधलें ऐशियासी ॥१॥ खाया ना जेवाया लेया ना नेसाया । दैन्य भोगावया आलें जन्मा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसी चिंताक्रांत मनीं दुःख धरिलें । म्हणे कां बायें दिधलें ऐशियासी ।।१।। खाया ना जेवाया लेया ना नेसाया। दैन्य भोगावया आलें जन्मा ||२||

रचनाकार: संत राजाई

ऐसी जोडी करा राम कंठीं धरा । जेणें चुके फेरा गर्भवास ॥१॥ नाशीवंत आटी प्रियापुत्रधन । बीज ज्याचा सीण तें चि फळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐसी ते जेवणीं ब्रह्मरसधणी । पुरविली आयणी निजभक्तांची ॥१॥ नाम्याचें उच्छिष्ट स्वीकारिलें देवें । कवतुक अवघें पाहती द्विज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसी ते सांडिली होइऩल पंढरी । येते वारकरी होत वाटे ॥१॥ देखिले सोहळे होती आठवत । चालती ते मात करूनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐसी प्रदक्षिणा करुनी विष्णुभक्ता । नामा जालासे सरता । रुक्मिणी म्हणे यातं तत्वतां । वैकुंठासी न्यावें जी ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसी मी मी करतां । अज्ञानाची अहंता । तेव्हा तैसी ईश्वरसत्ता । वर्तू लागे ॥१॥ सज्ञान अज्ञान । दोघे अदृष्टाधीन । साधुत्व वर्ते सज्ञान । अज्ञानीं अहंकर्ता ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐसीं वर्में आम्हां असोनियां हातीं । कां होऊं नेणतीं दिशाभुली ॥१॥ पोटाळुनी पाय कवळीन उभा । कृपे पद्मनाभा झालों नेदीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐसी वाढलिया सद्वासना । तेथें जिराली मनाची कल्पना । इंद्रियें विषय प्राणा । बोध जाला ॥१॥ लिंग विष्णु स्वप्न कंठस्नान । काल्पनिक भोग जाण । वाचा मध्यमा ऐसी खूण । मिळोनि ठेली त्या पदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ