भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें ऐकोनी नामा विचारी मानसीं । काय द्यावेम यासी प्रतिवचन

aisen aikoni nama vichari manasin | kay dyavem yasi prativachan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसें ऐकोनी नामा विचारी मानसीं । काय द्यावेम यासी प्रतिवचन ॥१॥ विठोबाचे पाय आठविले मनीं । बोले अमृतवचनीं तयाप्रति ॥२॥ सर्व सुख मज आहे पांडुरंगी । जावेम कवणा लागीं कोण्या तीर्था ॥३॥ आहिक्य परत्रीं मज चाड नाहीं सर्वथा । न लागती पुरुषार्था मुक्ति चारी ॥४॥ रंक होऊनियां पंढरी चोहटा । राखेन दारवंटा महाद्वारीं ॥५॥ या सुखाकारणें शरीर कर्वती फाडिलें । दुर्जय तोडिलें मायाजाळ ॥६॥ त्रिभुवनींचे वैभव सांडोनियां दुरी । जालोंसे भिकारी पंढरीचा ॥७॥ कल्पतुरची छाया कामधेनूचें दुभतें । संपूर्ण आईतें सर्वकाम ॥८॥ विठोबाचे पायीं मज काय उणें । परि वासनाचि मनें गिळिली माझी ॥९॥ जन्मोनी पाळिलों पोशिलों जयाचा । विकिलों कायावाचामनें त्यासी ॥१०॥ नामा म्हणे विठाबासी पुसा । आज्ञा देईल शिरसा धरीन त्याची ॥११॥