भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसे आत्मज्ञान उध्दरी जगासी

aise atmadnyan udhdari jagasi

रचनाकार: संत रामदास · अभंग
ऐसे आत्मज्ञान उध्दरी जगासी। पाहेना तयासी काय करुं सर्व काळ गेला दारिद्रय भोगितां। वैराग्य पाहतां तेथें नाहीं दारिद्रयाचें दु:ख केलें देशधडी। रामराज्य गुढी उभविली उभविली गुढी भक्तिपंथें जावें। शीघ्रचि पावावें समाधान समाधान रामीं रामदासां जालें। सार्थकानें केलें सार्थकचि।