भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें कलियुगाच्या मुळें । झालें धर्माचें वाटोळें

aisen kaliyugachya mulen | jhalen dharmachen vatolen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसें कलियुगाच्या मुळें । झालें धर्माचें वाटोळें ॥१॥ सांडुनियां रामराम । ब्राम्हण म्हणती दोमदोम ॥ध्रु.॥ शिवों नये तीं निळीं । वस्त्रें पांघरती काळीं ॥२॥ तुका म्हणे वृत्ति । सांडुनि गदा मागत जाती ॥३॥