भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें ऐकोनियां राजाई ते आली । रोषें येऊनि बोली बोलातसे

aisen aikoniyan rajai te ali | roshen yeuni boli bolatase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसें ऐकोनियां राजाई ते आली । रोषें येऊनि बोली बोलातसे ॥१॥ देवानें हें दिलें तुम्ही कां पाठवा । काशाचा गणोबा बोलतसा ॥२॥ ऐसें बोलोनियां हातें लोटी धोंटी धोंडा । तुमचिया वितंडा कोण पुसे ॥३॥ देवें मज दिलें तुम्ही कां मागतां । अलंकार आतां घडीन मी ॥४॥ नामा म्हणे धन ज्याचें त्यासी द्यावें । आपुलें तें घ्यावें आपणची ॥५॥