भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसीया खेळतां दिवसदिवसी, तंव आली एकादशी

aisiya khelatan divasadivasi, tanv ali ekadashi

रचनाकार: संत नागरी · अभंग
ऐसीया खेळतां दिवसदिवसी, तंव आली एकादशी । आनंद मानसी बहुत दोषी।। माहेरीचे सुख आठऊनि जीवी । प्रीती नीच नवी पाहावया ॥१॥ कामधाम मनी नाही आठवण । अखंड हे ध्यान कीर्तनाचे ।।धृ।। पाहता पर्वणु अजिचा हरिदिनु । सर्वमुख सण वैष्णवाचा ।। आजी डोळया पाहणे होईल सोहळा । भेटतो जे वेळा संतसखे।।२।। तान्हे बाछ जेवी चित्ती धेनुलागी । तैस्या तथा दोषी उतावीळा ।। वाटुनि पाहाता उत्कंठित मनी ।। गेली विसरोनी तानभूक ॥ ३॥ क्षणाक्षणि वास पाहाती करुनी । परी न देखती नयनी पूजाविधी ।। प्राण व्याकुळ माझा होय कासावीस ।। दिसती उदास दाही दिशा ||४|| केले मनोरथ नव्हती परिपूर्ण । तळमळीत मन चिंतातूर ।। म्हणतसे नागरी आता काय करु । जीवा न धरे धीरु जाऊ पाहे॥५॥