भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकलेंचि यावें एकलेचि जावे । जोडिलें नये सवें देखती सर्व

ekalenchi yaven ekalechi jave | jodilen naye saven dekhati sarva

रचनाकार: संत निळोबा · अभंग
एकलेंचि यावें एकलेचि जावे । जोडिलें नये सवें देखती सर्व ॥१॥ परि या मायाभ्रमें कैसा केला गुंता । न पुरती संचिता भोगितां भोगा ॥२॥ पुन्हा जन्म पुन्हा मरणाचि सांगती । यमदंड पावती गर्भवास ॥३॥ निळा म्हणे नये विकृति कंटाळा । टोके जेविं कावळा वमनासाठीं ॥४॥