भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकविध भाव संतांच्या चरणीं । घेईन पायवाणी धणीवरी

ekavidh bhav santanchya charanin | ghein payavani dhanivari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एकविध भाव संतांच्या चरणीं । घेईन पायवाणी धणीवरी ॥१॥ आनंदें चरण धरीन आवडी । हीच माझी जोडी सर्व जाणा ॥२॥ उतराई तयांच्या नोहे उपकारा । धाडिती माहेरा निजाचिया ॥३॥ एका जनार्दनीं घडतां त्यांचा संग । जन्ममरण पांग तुटे मग ॥४॥