भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकली रानागोविंदा सवें । गेलें ठावें तें झालें

ekali ranagovinda saven | gelen thaven ten jhalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एकली रानागोविंदा सवें । गेलें ठावें तें झालें ॥१॥ मज न म्हणा न म्हणा शिंदळी । नाहीं विषम जवळीं आतळलें ॥ध्रु.॥ नव्हती देखिली म्यां वाट । म्हणोनि हा धीट संग केला ॥२॥ सलगी धरी पयोधर । साहाती करमुर सवें ॥३॥ भेणें मिठी दिधली गळां । सेजे जवळ दडालें ॥४॥ आहेव मी गर्भीन पणे । हे सांगणे का ॥५॥ लगे तुका म्हणे शेवटा नेले । संपादिले उभयंता ॥६॥