भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकमेकांमाजी भाव एकविध । असे एक बोध भेदरहित

ekamekammaji bhav ekavidh | ase ek bodh bhedarahit

रचनाकार: संत गोरोबा · अभंग
एकमेकांमाजी भाव एकविध । असे एक बोध भेदरहित ॥ १ ॥ तूं मज ओळखी तूं मज ओळखी । मी तुज देखत आत्मवस्तु ॥ २ ॥ आत्म वस्तु देहीं बोलता लाज वाटे । अखंडता बिघडे स्वरूपाची ॥ ३ ॥ म्हणे गोरा कुंभार अनुभवाचा ठेवा । प्रत्यक्ष नामदेवा भेटलासी ॥ ४ ॥