भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकमेका गौळणी करिती विचार । चोरी करी कान्हा नंदाचा कुमर

ekameka gaulani kariti vichar | chori kari kanha nandacha kumar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एकमेका गौळणी करिती विचार । चोरी करी कान्हा नंदाचा कुमर ॥१॥ नायके वो बाई करुं गत काई । धरू जातां पळुन जातो न सांपडेचि बाई ॥२॥ दहीं दूध लोणी चोरी करुनियां खाये । पाहूं जातां कवाड जैसे तैसे आहे ॥३॥ एका जनार्दनी न कळें लाघव तयाचें । न कळेची ब्रह्मादिकां वेडावले साचें ॥४॥