भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकप्णें असें सर्वाठायीं वसे । योगी ज्या ध्यातसे हृदयकमळी

ekapnen asen sarvathayin vase | yogi jya dhyatase hrudayakamali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एकप्णें असें सर्वाठायीं वसे । योगी ज्या ध्यातसे हृदयकमळी ॥१॥ तें रूप साजिरें पाहतां गोजिरें । मन तेथें मुरे पाहतां पाहतां ॥२॥ खुंटली भावना तुटली वासना । साधनें तीं नाना हारपली. ॥३॥ संकल्प विकल्प मुळींच उडाला । एका जनार्दनीं धाला एकपणें ॥४॥