भजनी मालिका

भजने

आम्हा ताराल जरि श्रीहरि । कीर्ति तुमची वाढेल तरी ॥१॥ पुढेंहि चोखाळती वाटा । भाव भक्तिचा चोखटा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आम्हां देणें धरा सांगतों तें कानीं । चिंता पाय मनीं विठोबाचे ॥१॥ तेणें माझें चित्ता होय समाधान । विलास मिष्टान्न न लगे सोनें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां न कळे ज्ञान न कळे पुराण । वेदांचे वचन न कळे आम्हां ॥१॥ आगमाची आठी निगमाचा भेद । शास्त्रांचा संवाद न कळे आम्हां ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आम्हां नादीं विठ्ठलु छंदीं विठ्ठलु । हृत्पदी विठठलु मिळतसे ॥१॥ आम्हां धातुं विठ्ठलु मातु विठ्ठलु । गातुं विठ्ठलु आनंदें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आम्हां निकट वासें । कळों आलें जैसें तैसें । नाहीं अनारीसें । कान्होबाचे अंतरीं ॥१॥ पीडती आपुल्या भावना । जैसी जयाची वासना । कर्माचा देखणा । पाहे लीळा कौतुक ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां भय धाक कोणाचा रे पाहें । काळ मशक काय मानव हे ॥१॥ आम्हांसी ते काय चिंता या पोटाची । माउली आमुची पांडुरंग ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां भाविकांची जाती । एकविध जी श्रीपती । अळंकारयुक्ति । सरों शके चि ना ॥१॥ जाणें माउली त्या खुणा । क्षोभ उपजों नेदी मना । शांतवूनि स्तना । लावीं अहो कृपाळे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां येणें न जाणें जिणें ना मरणें । करणें ना भोगणें पापपुण्य ॥१॥ जैसें असों तैसे आपोआप प्रकाशों । कवणा न दिसों ब्रह्मादिकां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आम्हां विधिनिषेधाचें नाहीं पैं कारण । नाम मुखीं स्मरण गोविंदाचें ॥१॥ घडेल तें घडो जोडेल तें जोडो । आम्हीं तों न सोडोंक रामकृष्ण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आम्हां विष्णुदासां हें चि भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥१॥ वाणी नाहीं घ्यावें आपुलिया हातें । करोनियां चित्तें समाधान ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां वैष्णवांचा । नेम काया मने वाचा ॥१॥ धीर धरु जिवासाटीं । येऊं नेदूं लाभा तुटी ॥ध्रु॥ उचित समय । लाज निवारावे भय ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां वैष्णवांचा कुळधर्म कुळींचा । विश्वास नामाचा एका भावें ॥१॥ तरीच हरीदास म्हणवितां श्लाघीजे । निर्वासना कीजे चित्त आधी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम