भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां देणें धरा सांगतों तें कानीं । चिंता पाय मनीं विठोबाचे

amhan denen dhara sangaton ten kanin | chinta pay manin vithobache

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां देणें धरा सांगतों तें कानीं । चिंता पाय मनीं विठोबाचे ॥१॥ तेणें माझें चित्ता होय समाधान । विलास मिष्टान्न न लगे सोनें ॥ध्रु.॥ व्रत एकादशी दारीं वृंदावन । कंठीं ल्यारे लेणें तुळसीमाळा ॥२॥ तुका म्हणे त्याचे घरींची उष्टावळी । मज ते दिवाळी दसरा सण ॥३॥