भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां भय धाक कोणाचा रे पाहें । काळ मशक काय मानव हे

amhan bhay dhak konacha re pahen | kal mashak kay manav he

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां भय धाक कोणाचा रे पाहें । काळ मशक काय मानव हे ॥१॥ आम्हांसी ते काय चिंता या पोटाची । माउली आमुची पांडुरंग ॥ध्रु.॥ काय करावी हे कोणाची मान्यता । करितां अनंता कोण वारी ॥२॥ नाहीं शीण आम्हां झालें कवतुक । पुनीत हे लोक करावया ॥३॥ तुका म्हणे खातों आनंदाचे लाडू । नका चरफडूं घ्या रे तुम्ही ॥४॥