भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हा ताराल जरि श्रीहरि । कीर्ति तुमची वाढेल तरी

amha taral jari shrihari | kirti tumachi vadhel tari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आम्हा ताराल जरि श्रीहरि । कीर्ति तुमची वाढेल तरी ॥१॥ पुढेंहि चोखाळती वाटा । भाव भक्तिचा चोखटा ॥२॥ पुढेंहि चोखाळती वाटा । भाव-भक्तिचा चोखटा ॥३॥ विश्वासें त्या दृढवती । आमुचि देखोनि उत्तम गति ॥४॥ निळा म्हणे जी सर्वजाणा । हातीं तुमचे अवघ्या खुणा ॥५॥