भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां भाविकांची जाती । एकविध जी श्रीपती । अळंकारयुक्ति । सरों शके चि ना

amhan bhavikanchi jati | ekavidh ji shripati | alankarayukti | saron shake chi na

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां भाविकांची जाती । एकविध जी श्रीपती । अळंकारयुक्ति । सरों शके चि ना ॥१॥ जाणें माउली त्या खुणा । क्षोभ उपजों नेदी मना । शांतवूनि स्तना । लावीं अहो कृपाळे ॥ध्रु.॥ तुज अवघे होऊं येते । मज वाटों नये चित्ते । उपासने परतें । नये कांहीं आवडों ॥२॥ करूं रूपाची कल्पना । मुखीं नाम नारायणा । तुका म्हणे जना । जनस्थळ देखतां ॥३॥