भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां बोल लावा । तुम्हां अनुचित हें देवा

amhan bol lava | tumhan anuchit hen deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां बोल लावा । तुम्हां अनुचित हें देवा ॥१॥ ऐसें सांगा कां व्यालेती । काय नाहीं तुम्हां हातीं ॥ध्रु.॥ आतां धरा दुरी । वांयां दवडाया थोरी ॥२॥ तुका म्हणे ठायीं । ऐसें विचारावें पायीं ॥३॥