भजनी मालिका

भजने

राम हें माझें जीवींचें जीवन । पाहतां मन हें जालें उन्मन ॥१॥ साधन कांहीं नेणें मी अबला । शाम हें वीजु बैसलेंसे डोळा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

राम हेंचि स्नान राम हेंचि ध्यान । रामें घडे यज्ञ कोटी देखा ॥१॥ न लगती साधनें नाना मंत्र विवेक । रामनामीं सुख रंगीं कां रे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

रामकृष्ण ऐसें नाम । सुलभ सोपें तें सप्रेम । उच्चारितां नित्य नेम । तया पेणें वैकुंठ ॥१॥ नका करुं आळस कोणी । लहान थोर धरा मनीं । तुटेल आयणी । जन्म आणि मृत्यूची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रामकृष्णनाम मांडीं पां वोळी । तेणें होईल होळी पापा धुनी ॥१॥ ऐसा मना छंद लावीं रे अभ्यास । जया नाहीं नास ब्रम्हरसा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

रामनाम जपे शिव तो स्मशानीं । वाल्मिक तो मुनी नाम जपे ॥१॥ गणिका तारिली रामनाम घेतां । पातकी तत्त्वतां उद्धरिले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रामनाम म्हणतां संसाराचें भय । म्हणती त्याच्या होय जिव्हे कुष्ट ॥१॥ अमृत सेवितां कैंचेम ये मरन । जाणती हे खूण अनुभवी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

रामनाम वसे ज्याचे मुखीं नित्य । त्याचेनि पतीत उद्धरण ॥१॥ रामनाम मंत्र जपे नित्यकाळ । त्यासी कळिकाळ हात जोडी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रामनाम स्मरे पुरुषोत्तम रे । सहज विद्या ज्ञेय हाही अविद्या धर्म रे ॥१॥ अहं आत्मा हेंही न साही सर्व क्रिया भ्रम रे । विजनवन निरंजन जनार्दन रे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ