भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम हें माझें जीवींचें जीवन । पाहतां मन हें जालें उन्मन

ram hen majhen jivinchen jivan | pahatan man hen jalen unman

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
राम हें माझें जीवींचें जीवन । पाहतां मन हें जालें उन्मन ॥१॥ साधन कांहीं नेणें मी अबला । शाम हें वीजु बैसलेंसे डोळा ॥२॥ लोपल्या चंद्रसुर्याच्या कळा । तो राम माझा जीवीचा जिव्हाळा ॥३॥ प्रकाश हा दाटला दाही दिशा । पुढें वो मार्ग न दिसे आकाशा ॥४॥ खुंटली गति श्वासा वो उश्वासा । तो राम माझा भेटेल वो कैसा ॥५॥ यासी हो साच परिसा हो कारण । शरण एका जनार्दन नेणें तेंचि साधन ॥६॥