भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामनाम उच्चार होटीं । संसाराची होये तुटी

ramanam uchchar hotin | sansarachi hoye tuti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रामनाम उच्चार होटीं । संसाराची होये तुटी ॥१॥ संसार तो समुळ जाय । राम उच्चारुनी पाहे ॥२॥ मागें अनुभवा आलें । गजेंद्रादि उद्धरिलें ॥३॥ शिव ध्यातो मानसीं । रामनाम अहर्निशीं ॥४॥ एका जनार्दनीं राम । पूर्ण परब्रह्मा निष्काम ॥५॥