भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामनाम पावन । यापरतें थोर कोण

ramanam pavan | yaparaten thor kon

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रामनाम पावन । यापरतें थोर कोण ॥१॥ जडशिळा ते सागरीं । नामें तरल्या निर्धारीं ॥२॥ राम जप सदा । नोहे काळाची ती बाधा ॥३॥ नाम घेतां निशिदिनीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥