भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामकृष्ण ऐसें नाम । सुलभ सोपें तें सप्रेम । उच्चारितां नित्य नेम । तया पेणें वैकुंठ

ramakrushna aisen nam | sulabh sopen ten saprem | uchcharitan nitya nem | taya penen vaikunth

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रामकृष्ण ऐसें नाम । सुलभ सोपें तें सप्रेम । उच्चारितां नित्य नेम । तया पेणें वैकुंठ ॥१॥ नका करुं आळस कोणी । लहान थोर धरा मनीं । तुटेल आयणी । जन्म आणि मृत्यूची ॥२॥ आहे मज भरंवसा । एका जनार्दनीं ठसा । आळस नका करुं सहसा । लहान थोर सकळ ॥३॥