भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामकृष्ण गोविंदाचें नामस्मरण वाचे

ramakrushna govindachen namasmaran vache

रामकृष्ण गोविंदाचें नामस्मरण वाचे । घडिये घडिये साचें ध्यान श्रीविठ्ठलाचें ॥१॥ एकनाम आठवितां दुतां पडियेली चिंता । नाम आनंदें गातां पाविजे सायुज्यता ॥२॥ तिहीं लोकीं नाम थोर वेदशास्त्रांचे सार । सगुण निर्गुणाकार निज ब्रह्मासी ॥३॥ बापरखुमादेविवर कृपाळु उदारु । नामस्मरणें पारु उतरा हा निर्धारु ॥४॥