भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामकृष्णहरि मुकुंद मुरारी

ramakrushnahari mukund murari

रचनाकार: संत बोधले · अभंग
रामकृष्णहरि मुकुंद मुरारी । नाम हे गोजिरी साज तुज ॥१॥ भव मूळ छेदक पंढरीनायेक । देतो प्रेमसुख भक्तालागी ॥२॥ जिवीचि जीवनकळा आठवी वेळोवेळा । केधवा देखेन डोळा आत्माराम ॥३॥ बोधला म्हणे देवा कळली तुझी लीळा । व्यापक गोपाळा खेळसील ॥४॥