भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामकृष्णनाम मांडीं पां वोळी । तेणें होईल होळी पापा धुनी

ramakrushnanam mandin pan voli | tenen hoil holi papa dhuni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रामकृष्णनाम मांडीं पां वोळी । तेणें होईल होळी पापा धुनी ॥१॥ ऐसा मना छंद लावीं रे अभ्यास । जया नाहीं नास ब्रम्हरसा ॥ध्रु.॥ जोडी तरी ऐसी करावी न सरे । पुढें आस नुरे मागुताली ॥२॥ तुका म्हणे ऐसें धरा कांहीं मनीं । यातायाती खाणीं चुकतील ॥३॥