भजनी मालिका

भजने

दुखवलें चित्त आजिच्या प्रसंगें । बहु पीडा जगें केली देवा ॥१॥ कधीं हा संबंध तोडिसी तें नेणें । आठवूनि मनें पाय असें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दुःखाचिये साटीं तेथें मिळे सुख । अनाथाची भूक दैन्य जाय ॥१॥ उदाराचा राणा पंढरीस आहे । उभारोनि बाहे पालवितो ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

दुःखाचे डोंगर लागती सोसावे । ऐसें तंव ठावें सकळांसीं ॥१॥ कांहीं न करिती विचार हिताचा । न करिती वाचा नामघोष ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दुःखाच्या खडकीं आदळती प्राणी । परि संसाराचा मनीं वीट नये ॥१॥ कामाचिया लाटे कर्दमाचे पुरीं । बुडे तरी हाव धरी अधिकाराची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दुःखी होती लोभें करावें तें काईं । उडतील गाईं म्हैसी आतां ॥१॥ आणीकही कांहीं होईंल अरष्टि । नायिके हा धीट सांगितलें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

दुजा ऐंसा कोण बळी आहे आतां । हरी या अनंता पासूनिया ॥१॥ बळियाच्या आम्ही झालों बळिवंता । करूं सर्व सत्ता सर्वांवरी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

दुजियाची निंदा नको रे करूं मना । चिंती या चरण संताचिया ॥१॥ होउनी उदास गाई सदा नामक । बैसोनि निष्काम एकान्तासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दुजी येऊनी पुढें बोले ऐकें वो बाई । घुसळण घुसळितां डेरां फोडिला पाहीं ॥१॥ धांवुनि आलीं सासु मारितसें मजला । हांसतसे आपण तेथोनि पळाला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दुजें खंडे तरी । उरला तो अवघा हरी ॥ आपणाबाहेरी । न लगे ठाव धुंडावा ॥१॥ इतुलें जाणावया जाणा । कोंडें तरी मनें मना ॥ पारधीच्या खुणा । जाणतें चि साधावे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दुजे द्वैत सांडी एक तत्त्व मांडी । अद्वैत ब्रह्मांडीं पै सुकीजे ॥१॥ तें रुप पंढरी पुंडलीका द्वारीं । मुक्ति मार्ग चारी वश्य रया ।