भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुःखी होती लोभें करावें तें काईं । उडतील गाईं म्हैसी आतां

duhkhi hoti lobhen karaven ten kain | udatil gain mhaisi atan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुःखी होती लोभें करावें तें काईं । उडतील गाईं म्हैसी आतां ॥१॥ आणीकही कांहीं होईंल अरष्टि । नायिके हा धीट सांगितलें ॥२॥ सांगों चला याच्या मायबापांपाशीं । निघाले घरासि देवा रागें ॥३॥ रागें काला देतां न घेती कवळ । टोकवी गोपाळ क्रोधियांसि ॥४॥ क्रोध देवावरी धरियेला राग । तुका म्हणे भाग न लभती ॥५॥