भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुजेपणाचा भावो वायां वाढविसी गव्हारा

dujepanacha bhavo vayan vadhavisi gavhara

दुजेपणाचा भावो वायां वाढविसी गव्हारा । उतराई या देहा कैसा होसील । दुजेपणें पाहसी तरि देहीं देवो पाही । सेखीं दुजेपणे नाहीं तूंची येकला रया ॥१॥ भ्रांति पडलिया मना नेणसी सुख ब्रह्म चुकलासि वर्म अरे मुढा ॥२॥ ते कल्पिलिया नकळे गुरुकृपे वेगळें । वायांविण उगलें कां धांवतोसि सैरा ॥३॥ बापरखुमादेविवरुविठ्ठलु जन्मोजन्मीं वोळगिला अससी तरि ते खुण पावसी निभ्रांतरया ॥४॥