भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुजेपणी ठाव द्वैत हे फेडिले

dujepani thav dvait he phedile

रचनाकार: संत सोपान · अभंग
दुजेपणी ठाव द्वैत हे फेडिले । अद्वैत बिंबले तेजोमय ।। १ ॥ तेजाकार दिशा बिंबी बिंब एक । निवृत्तीने चोख दाखविले ॥२॥ निमाली वासना बुडाली भावना । गेली ते कल्पना ठाव नाही ॥३॥ सोपान नैश्वर परब्रह्म साचार । सेवितु अपार नाम घोटे ॥४॥