भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुजेपणा मिठी आपणचि उठी

dujepana mithi apanachi uthi

दुजेपणा मिठी आपणचि उठी । कल्पना हे सृष्टि गाळूं पाहे ॥ १ ॥ तें कृष्णरूप गाढे यशोदा घे पुढें । दूध लाडेंकोडें मागतसे ॥ २ ॥ सृष्टीचा उपवडु ब्रह्मांडाचा घडु । ब्रह्मींच उपवडू उघडा दिसे ॥ ३ ॥ निवृत्ति उघड ब्रह्मांडामाजि लोळे । नंदाघरीं खेळे गोपवेष ॥ ४ ॥