भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुजेपणी दृष्टी न घालुं । सर्वा चालु एक सत्ता

dujepani drushti na ghalun | sarva chalu ek satta

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दुजेपणी दृष्टी न घालुं । सर्वा चालु एक सत्ता ॥१॥ हाचि पुर्वीचा संकल्प । निर्विकल्प नाम जपूं ॥२॥ नाहीं काहीं वाटावाटीं । करुं एकवटी मनाची ॥३॥ एका जनार्दनीं उदास । जाहलों दास संतचरणीं ॥४॥