भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुजियाची निंदा नको रे करूं मना । चिंती या चरण संताचिया

dujiyachi ninda nako re karun mana | chinti ya charan santachiya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दुजियाची निंदा नको रे करूं मना । चिंती या चरण संताचिया ॥१॥ होउनी उदास गाई सदा नामक । बैसोनि निष्काम एकान्तासी ॥२॥ एकान्तीसी गोडी शंभु जाणे जोडी । आणिक परवडी न कळे कांहीं ॥३॥ एका जनार्दनीं रामनाम सार । करितां उच्चार आळस नको ॥४॥