भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुखवलें चित्त आजिच्या प्रसंगें । बहु पीडा जगें केली देवा

dukhavalen chitta ajichya prasangen | bahu pida jagen keli deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुखवलें चित्त आजिच्या प्रसंगें । बहु पीडा जगें केली देवा ॥१॥ कधीं हा संबंध तोडिसी तें नेणें । आठवूनि मनें पाय असें ॥ध्रु.॥ आणिकांची येती अंतरा अंतरें । सुखदुःख बरेंवाइट तीं ॥२॥ तुका म्हणे घडे एकांताचा वास । तरिच या नास संबंधाचा॥३॥