भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुजें खंडे तरी । उरला तो अवघा हरी ॥ आपणाबाहेरी । न लगे ठाव धुंडावा

dujen khande tari | urala to avagha hari || apanabaheri | na lage thav dhundava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुजें खंडे तरी । उरला तो अवघा हरी ॥ आपणाबाहेरी । न लगे ठाव धुंडावा ॥१॥ इतुलें जाणावया जाणा । कोंडें तरी मनें मना ॥ पारधीच्या खुणा । जाणतें चि साधावे ॥ध्रु.॥ देह आधीं काय खरा । देहसंबंधपसारा ॥ बुजगावणें चोरा । रक्षणसें भासतें ॥२॥ तुका करी जागा । नको चाचपूं वाउगा ॥ आहेसि तूं आगा । अंगीं डोळे उघडी ॥३॥