भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुःखाचे डोंगर लागती सोसावे । ऐसें तंव ठावें सकळांसीं

duhkhache dongar lagati sosave | aisen tanv thaven sakalansin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुःखाचे डोंगर लागती सोसावे । ऐसें तंव ठावें सकळांसीं ॥१॥ कांहीं न करिती विचार हिताचा । न करिती वाचा नामघोष ॥ध्रु.॥ भोगें कळों येतो मागिल ते जन्म । उत्तम मध्यम कनिष्ठ ते ॥२॥ तुका म्हणे येथें झांकितील डोळे । भोग देतेवेळे येईल कळों ॥३॥