भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

जन्मा येऊन उदार जाला । उद्धार केला वंशाचा । मेळवूनि धन मेळवी माती । सदा विपत्ती भोगीतसे ॥१॥ नाम घेतां न मिळे अन्न । नव्हे कारण देखिलिया । धर्म करितां ऐके कानीं । बांधे निजोनि डोकियासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जन्मा येऊनि कां रे निदसुरा । जायें भेटी वरा रखुमाईच्या ॥१॥ पाप ताप दैन्य जाईल सकळ । पावसी अढळउत्तम तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जन्मा येऊनि तया लाभ जाला । बिडवई भेटला पांडुरंगा ॥१॥ संसारदुःखें नासिलीं तेणें । उत्तम हें केणें नामघोष ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जन्मा येणें घडे पातकाचे मूळें । संचिताचें फळ आपुलिया ॥१॥ मग वांयांविण दुःख वाहों नये । रुसोनियां काय देवावरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जन्मांतरीं शुद्ध नाहीं आचरण । यालागीं चरण अंतरले ॥१॥ वोडवलें संचित येणें जन्में पाहतां । आतां पंढरिनाथा कृपा करीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जप तप ध्यान न लगे धारणा । विठ्ठलकीर्त्तनामाजी उभा ॥१॥ राहें माझ्या मना दृढ या वचनीं । आणिक तें मनीं न धरावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जपाचें निमित्त झोपेचा पसर । देहाचा विसरू पाडूनियां ॥१॥ ऐसीं तीं भजनें अमंगळवाणी । सोंगसंपादणी बहुरूप्याची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जया दोषां परीहार । नाहीं नाहीं धुंडितां शास्त्र । ते हरती अपार । पंढरपुर देखिलिया ॥१॥ धन्य धन्य भीमातीर । चंद्रभागा सरोवर । पद्मातीर्थी विठ्ठल वीर । क्रीडास्थळ वेणुनादीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जया नाहीं नेम एकादशीव्रत । जाणावें तें प्रेत सर्व लोकीं ॥१॥ त्याचें वय नित्य काळ लेखीताहे । रागें दात खाय कराकरा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जयाचिये द्वारीं सोन्याचा पिंपळ । अंगीं ऐसें बळ रेडा बोले ॥१॥ करील तें काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुद्ध अंगीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जयाचिये वाचे नये हा विठ्ठल । त्याचे मज बोल नावडती ॥१॥ शत्रु तो म्यां केला न म्हणें आपुला । जो विन्मुख विठ्ठला सर्वभावें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

जयांचें अंगलें लेतां नाहीं मान । शोभा नेदी जन हांसविलें ॥१॥ गुसिळतां ताक कांडितां भूस । साध्य नाहीं क्लेश जाती वांयां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

जयासी नावडे वैष्णवांचा संग । जाणावा तो मांग जन्मांतरीं ॥१॥ अपवित्र वाचा जातीचा अधम । आचरण धर्म नाहीं जया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जरा कर्णमूळीं सांगों आली गोष्टी । मृत्याचिये भेटी जवळी आली ॥१॥ आतां माझ्या मना होई सावधान । ॐपुण्याची जाण कार्यसिद्धी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जरि हा हो कृपा करिल नारायण । तरी हें चि ज्ञान ब्रम्ह होय ॥१॥ कोठोनियां कांहीं न लगे आणावें । न लगे कोठें जावें तरावया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम