भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयाचिये वाचे नये हा विठ्ठल । त्याचे मज बोल नावडती

jayachiye vache naye ha viththal | tyache maj bol navadati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जयाचिये वाचे नये हा विठ्ठल । त्याचे मज बोल नावडती ॥१॥ शत्रु तो म्यां केला न म्हणें आपुला । जो विन्मुख विठ्ठला सर्वभावें ॥२॥ जयासी नावडे विठोबाचें नाम । तो जाणा अधम तुका म्हणे ॥३॥