भजनी मालिका
← भजनांकडे परत

जये ठायीं आवडी ठेली । मज ते बोली न संडे

jaye thayin avadi theli | maj te boli na sande

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जये ठायीं आवडी ठेली । मज ते बोली न संडे॥१॥ पुरवावें जीवींचें कोड । भेटी गोड तुज मज ॥ध्रु.॥ आणिलें तें येथवरी । रूप दुरी न करावें ॥२॥ तुका म्हणे नारायणा । सेवाहीना धिग वृत्ति ॥३॥